हिवताप (मलेरिया)
रोगकारक घटक –प्लाझ्मोडियम (Plasmodium)
जाती –प्ला. वायवॅक्स(P. Vivax), प्ला.फ़ाल्सीपॅरम(P.Falciparam)[ह्या भारतात आढळणाया दोन मुख्य जाती],प्ला.मलेरिये(P.Malariae), प्ला. ओवेल(P.Ovale)
पसरवणारे घटक–मच्छर(डास) -ऍनाफ़िलीस जातीचे(Anopheles)
रोगकारक घटकाचे जीवनचक्र–
प्लाझ्मोडियम हे रक्तपरजीवी (Blood Parasites) या प्रकारात मोडतात.जेव्हा ऍनाफ़िलीस जातीच्या मच्छराची मादी हिवताप झालेल्या रूग्णाला दंश करते तेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्ताबरोबर प्लाझ्मोडियम मच्छराच्या शरीरात शिरतात तिथे ते विकसीत होऊन संक्रमण पसरवण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचतात.
जेव्हा अशा स्थितीतील डास निरोगी माणसास दंश करतो तेव्हा हे परजीवी त्वचेतील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. तेथून रक्ताबरोबर ते यकृतामध्ये(Liver) प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात.या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात.
आता ते रक्तपेशींना आपले लक्ष्य करतात. रक्तपेशींमध्ये शिरून ते विकसित तसेच दुभाजित होत रहातात. रक्तपेशींची क्षमता संपल्यावर त्या फुटतात व प्लाझ्मोडियम नवीन रक्तपेशींना संक्रमित करतात.आणि हे चक्र सुरु राहते. काही प्लाझ्मोडियम, डासांना संक्रमित करण्यायोग्य अवस्थेत विकसित होतात.
रूग्णांमधील लक्षणे-
थंडी भरून ताप येणे हे हिवतापाचे प्रमुख लक्षण आहे .जेव्हा रक्तपेशी फुटतात तेव्हा हानिकारक तत्वे रक्तात मिसरळण्यामुळे थंडी भरून ताप येतो. आजार प्रस्थापित झाल्यावर ही प्रकिया दर २४ किंवा ४८ तासांनी पुनवर्तित होते तेव्हा तेव्हा हा ताप येतो.ऒषधे लवकर सुरू केल्यास असा क्रम दिसण्याची शक्यता कमी होते. यकृताला ईजा पोहोचल्यामुळे कमीअधिक प्रमाणात कावीळही होऊ शकते.
रूग्णांमधील चिन्हे-
ताप, यकृताला सूज
गुंतागुंत (complications)-
प्ला.फ़ाल्सीपॅरम या जातीमुळे गुंतागुंतींचा हिवताप होऊ शकतो.
या प्रकारात मेंदुचा हिवताप हा घातक प्रकार मोडतो. यामध्ये रुग्ण बेशुद्ध होणे, आकडी येणे, शेवटी मृत्युही ओढावू शकतो.
तसेच रक्तशर्करा कमी होणे, रक्तपेशी प्लेटलेट्ची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात.
गर्भवती स्त्रियांना अतितापामुळे त्यांना तसेच बाळाला धोका संभवतो.
उपाययोजना-
प्रतिबंध-
ताप होऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे .
पण बोलणे सोपे करणे अवघड अशातला हा प्रकार आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू न देणे इत्यादी उपायांची तर तुम्हालाही माहिती आहेच
मच्छरप्रतिबंधक ऒषधे,जाळ्या ,फ़वारे इत्यादींचा वापर केला जातो.
हिवतापावर ऒषधे-
क्लोरोक्वीन हे हिवतापावरील महत्वाचे ऒषध असले तरी प्ला.फ़ाल्सीपॅरमवर त्याचा अजिबात असर होत नाही ;प्ला. वायवॅक्स त्याला अजूनसुद्धा प्रतिसाद देतो (ऒषधांच्या अर्निबंध आणि चुकीच्या वापराचा हा परिणाम)
म्हणून या दोन जातींमध्ये फरक करण्यासाठी रक्ताचा तपास करणे अतिशय आवश्यक आहे.
प्ला.फ़ाल्सीपॅरमसाठी नेहमीच एकावेळी दोन ऒषधांचा वापर केला जातो. आपल्याकडे प्रामुख्याने आर्टीसुनेट आणि आणखी एका वर्गातील ऒषधांचा वापर केला जातो.
गुंतागुंतींच्या हिवतापाच्या रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य.
(नमूद केलेल्या ऒषधांची नावे वर्गीकरणातील आहेत बाहेर त्या नावांनी उपलब्ध नाहीत.)
धन्यवाद!!!!!!!
tumcha blog phar avadla…tumhi aajun lhivaylcha prayatna kara..hi site paha http://www.quillpad.in hechana tumala phar madad vahil…vaprun paha…
By: abhinav on जुलै 20, 2007
at 6:29 सकाळी
धन्यवाद अभिनव..
By: डॉ. केतन on जुलै 20, 2007
at 3:11 pm