Posted by: डॉ. केतन | जुलै 27, 2007

पावसाळ्यातील आजार –भाग ३

डेंग्यू (Dengue Fever)

रोगकारक घटकडेंग्यू जातीचे विषाणू (virus)

पसरवणारे घटकमच्छर(डास) -एडीस इजिप्ते जातीचे(Aedes Aegypti)

जीवनचक्र

या जातीचे मच्छर ताज्या साठलेल्या पाण्यात वाढतात.कुंड्या,टायर,नारळाच्या कवट्या,प्लास्टिकच्या भांडी इत्यादी घराच्या अवतीभवती आढळणार्‍या वस्तूंमध्ये ते वाढतात.त्यांचे चावा घेण्याचे प्रमाण दिवसा अधिक असते.

रूग्णांमधील लक्षणे-

डेंग्यू ताप हा कमीअधिक अशा वेगवेगळ्या तीव्रतेचा असू शकतो.

) डेंग्यू ताप (Dengue Fever)–

लहान मुलांमध्ये मुख्यत्वे सॊम्य स्वरुपाचा ताप येतो.मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे,अंगदुखी ,अशक्तपणा,अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप (Break bone fever) असेही म्हणतात.

) डेंग्यू रक्तस्त्राव ताप (Dengue hemorrhagic fever)-

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्त्राव- चट्टे उठणे,हिरड्यांमधून रक्तस्त्राव;तसेच अंतर्गत रक्तस्त्राव-आंत्रामधून रक्तस्त्राव,प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत,पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते.

) डेंग्यू अतिगंभीर आजार (Dengue shock syndrome)-

ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते.यात रूग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे,रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो.

तपासणी

रक्ततपासणीमधून या रोगाचे निदान होऊ शकते.

उपाययोजना-

प्रतिबंध-

डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजुबाजूला पाणी साठू देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे डासांना प्रतिबंध घालू शकतात.

ऒषधे-

या विषाणूवर प्रतिजॆविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रूग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रूग्णाचे प्राण वाचू शकतात.

धन्यवाद!!!!!!!

Posted by: डॉ. केतन | जुलै 21, 2007

पावसाळ्यातील आजार –भाग २

लेप्टोस्पारोसिस (Leptospirosis)

रोगकारक घटकलेप्टोस्पायरा

जातीलेप्टोस्पायरा इंटरोगॅन्स (Leptospira Interrogans) हे स्पायरोकीट (spirochetes) या वर्गातील जीवघटक आहेत.

पसरवणारे घटक

हा आजार प्राण्यांपासून मनुष्याला संक्रमित होणाऱ्या (zoonosis) प्रकारात मोडतो. हे जीवघटक बऱ्याच सस्तन प्राण्यांमध्ये आढळले तरी प्रामुख्याने उंदीर हे महत्त्वाचे प्रसारक आहेत. अनेक पाळीव प्राण्यांमध्ये (कुत्रा,गायी इत्यादी)हे जीवघटक आढळतात. या प्राण्यांमध्ये त्यांच्यामुळे कोणताही प्रकाराचा आजार होत नाही

रोगकारक घटकाचे जीवनचक्र

माणसाला या आजाराची लागण प्रसारक प्राण्यांच्या मूत्र ,रक्त किंवा दूषित उतींच्या संपर्कातून होते. पावसाळ्यातील साठलेल्या किंवा वाहत आलेल्या पाण्यात असलेले अशा प्राण्यांचे मूत्र प्रामुख्याने आजाराचे कारण बनते.

हे जीवघटक त्वचेला असलेल्या छोट्या जखमांमधून किंवा तोंड वा डोळे अशा भागांच्या बाह्यआवरणातून शरीरात प्रवेश करतात. शरीरात प्रवेश केल्यावर ते शरीरातील विविध अवयवांतील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवतात आणि त्या अवयवांचे कार्य बिघडवतात.मूत्रपिंड, यकृत,स्नायू,डोळे,फुफुसे यांना प्रामुख्याने इजा पोहोचते.

रूग्णांमधील लक्षणे-

दोन प्रकाराचा लेप्टोस्पायरोसिसचा आजार आढळून येतो

) कावीळीशिवाय आणि ) कावीळीबरोबर

) कावीळीशिवाय(Anicteric) -

हा प्रकार जवळपास ९०% लेप्टोस्पायरोसिसच्या रूग्णांमध्ये आढळून येतो. हा सॊम्य स्वरुपाचा असून रूग्णाला ताप येणे ,स्नायूंमध्ये दुखणे,डोके दुखणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसून येतात. ताप येऊन गेल्यावर - आठवड्यांनंतर ताप परत येतो; तो मुख्यत्वे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे असतो.अन्य लक्षणेही सॊम्य स्वरुपात दिसून येतात.काहींमध्ये मेंदूज्वराची लक्षणे दिसून येतात.या प्रकारात मृत्यू येत नाही.

) गंभीर स्वरूपाचा; कावीळीबरोबरचा लेप्टोस्पायरोसिस किंवा वेल्स आजार (Weil’s Disease)–

हा प्रकार १०% रूग्णांमध्ये आढळतो. कावीळ,मूत्रसंस्था बिघडणे,अंतर्गत रक्तस्त्राव इत्यादी गोष्टी दिसून येतात. आजाराची सुरूवात वरील प्रकाराप्रमाणे ताप इतर गोष्टींनी होते पण थोड्या दिवसांनी कावीळीची सुरूवात होते. या आजारात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

तपासणी

रक्ताच्या नमुन्यांमधून या आजाराची शहानिशा करता येते.

उपाययोजना-

प्रतिबंध-

मुंबईसारख्या शहरामध्ये उंदरांची संख्या आटोक्यात आणणे हा उपाय रोगाला आळा घालू शकतो.

तसेच पावसाळी दिवसात शक्यतो साठलेल्या पाण्यात ,सांडपाण्यात जाणेच चांगले.

ऒषधे-

पेनिसीलीन,डॉक्सीसायक्लीन,इरीथ्रोमायसीन ही ऒषधॆ वापरली जातात.

मात्र कावीळीची लक्षणे दिसताच रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य.(नमूद केलेल्या ऒषधांची नावे वर्गीकरणातील आहेत बाहेर त्या नावांनी उपलब्ध नाहीत.)

धन्यवाद!!!!!!!

Posted by: डॉ. केतन | जुलै 19, 2007

पावसाळ्यातील आजार –भाग १

हिवताप (मलेरिया)

रोगकारक घटकप्लाझ्मोडियम (Plasmodium)

जातीप्ला. वायवॅक्स(P. Vivax), प्ला.फ़ाल्सीपॅरम(P.Falciparam)[ह्या भारतात आढळणाया दोन मुख्य जाती],प्ला.मलेरिये(P.Malariae), प्ला. ओवेल(P.Ovale)

पसरवणारे घटकमच्छर(डास) -ऍनाफ़िलीस जातीचे(Anopheles)

रोगकारक घटकाचे जीवनचक्र

प्लाझ्मोडियम हे रक्तपरजीवी (Blood Parasites) या प्रकारात मोडतात.जेव्हा ऍनाफ़िलीस जातीच्या मच्छराची मादी हिवताप झालेल्या रूग्णाला दंश करते तेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्ताबरोबर प्लाझ्मोडियम मच्छराच्या शरीरात शिरतात तिथे ते विकसीत होऊन संक्रमण पसरवण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचतात.

जेव्हा अशा स्थितीतील डास निरोगी माणसास दंश करतो तेव्हा हे परजीवी त्वचेतील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. तेथून रक्ताबरोबर ते यकृतामध्ये(Liver) प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात.या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात.

आता ते रक्तपेशींना आपले लक्ष्य करतात. रक्तपेशींमध्ये शिरून ते विकसित तसेच दुभाजित होत रहातात. रक्तपेशींची क्षमता संपल्यावर त्या फुटतात प्लाझ्मोडियम नवीन रक्तपेशींना संक्रमित करतात.आणि हे चक्र सुरु राहते. काही प्लाझ्मोडियम, डासांना संक्रमित करण्यायोग्य अवस्थेत विकसित होतात.

रूग्णांमधील लक्षणे-

थंडी भरून ताप येणे हे हिवतापाचे प्रमुख लक्षण आहे .जेव्हा रक्तपेशी फुटतात तेव्हा हानिकारक तत्वे रक्तात मिसरळण्यामुळे थंडी भरून ताप येतो. आजार प्रस्थापित झाल्यावर ही प्रकिया दर २४ किंवा ४८ तासांनी पुनवर्तित होते तेव्हा तेव्हा हा ताप येतो.ऒषधे लवकर सुरू केल्यास असा क्रम दिसण्याची शक्यता कमी होते. यकृताला ईजा पोहोचल्यामुळे कमीअधिक प्रमाणात कावीळही होऊ शकते.

रूग्णांमधील चिन्हे-

ताप, यकृताला सूज

गुंतागुंत (complications)-

प्ला.फ़ाल्सीपॅरम या जातीमुळे गुंतागुंतींचा हिवताप होऊ शकतो.

या प्रकारात मेंदुचा हिवताप हा घातक प्रकार मोडतो. यामध्ये रुग्ण बेशुद्ध होणे, आकडी येणे, शेवटी मृत्युही ओढावू शकतो.

तसेच रक्तशर्करा कमी होणे, रक्तपेशी प्लेटलेट्ची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात.

गर्भवती स्त्रियांना अतितापामुळे त्यांना तसेच बाळाला धोका संभवतो.

उपाययोजना-

प्रतिबंध-

ताप होऊ नये यासाठी डास चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे .

पण बोलणे सोपे करणे अवघड अशातला हा प्रकार आहे.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू देणे इत्यादी उपायांची तर तुम्हालाही माहिती आहेच

मच्छरप्रतिबंधक ऒषधे,जाळ्या ,फ़वारे इत्यादींचा वापर केला जातो.

हिवतापावर ऒषधे-

क्लोरोक्वीन हे हिवतापावरील महत्वाचे ऒषध असले तरी प्ला.फ़ाल्सीपॅरमवर त्याचा अजिबात असर होत नाही ;प्ला. वायवॅक्स त्याला अजूनसुद्धा प्रतिसाद देतो (ऒषधांच्या अर्निबंध आणि चुकीच्या वापराचा हा परिणाम)

म्हणून या दोन जातींमध्ये फरक करण्यासाठी रक्ताचा तपास करणे अतिशय आवश्यक आहे.

प्ला.फ़ाल्सीपॅरमसाठी नेहमीच एकावेळी दोन ऒषधांचा वापर केला जातो. आपल्याकडे प्रामुख्याने आर्टीसुनेट आणि आणखी एका वर्गातील ऒषधांचा वापर केला जातो.

गुंतागुंतींच्या हिवतापाच्या रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य.

(नमूद केलेल्या ऒषधांची नावे वर्गीकरणातील आहेत बाहेर त्या नावांनी उपलब्ध नाहीत.)

धन्यवाद!!!!!!!

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.